निकेश जिलठे, वणी: चालू शैक्षणिक सत्रातील दिनांक 19 व 20 डिसेंबर 2017 या कालावधीत जि प माजी शासकिय माध्यमिक शाळा वणी येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी घेण्यात आली. यात अनु जाती मुलांची निवासी शाळा परसोडा (परसोनी फाटा) या शाळेने नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. या प्रदर्शनीमध्ये सर्व गटात या शाळेने सहभागी होऊन सर्व गटातुन प्रथम क्रमांक पटकावला आहे. परसोडा शाळेने हे यश मिळवून ग्रामीण भागातील शासकिय शाळा या इतर शाळांपेक्षा कुठेही कमी नाही हे दाखवून दिले आहे.
शाश्वत विकासासाठी विज्ञान हा विषय असलेल्या विज्ञान प्रदर्शनीत प्राथमिक गटातुन ज्वालामुखीचा ऊद्रेक या प्रतिक्रुती मध्ये निकुंज आत्राम व खुशाल पवार हे विद्यार्थी सहभागी होते. त्यांना शिक्षक पी एस मेश्राम यांनी मार्गदर्शन केले. तर माध्यमिक गटातुन विघटनशिल व अविघटनशिल पदार्थ यांचा पुनर्वापर या विषयावर अनिकेत निखाडे व चेतन मुनेश्वर हे विद्यार्थी सहभागी होते. त्यांना विज्ञान शिक्षक पी के लेदाडे यांनी मार्गदर्शन केले.
अहवाल प्रयोग शाळा सहायक या गटातुन या शाळेतील प्रयोग शाळा सहायक विलास जाधव यांच्या किटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची काळजी यावर आधारित ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलासाठी प्रेरणादायी संदेश देणारी प्रतिक्रुती तयार करण्यात आली.
या सर्व गटात अनु जाती जमातीच्या मुलांची निवासी शाळा परसोडा या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी उल्लेखणीय यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाचे केंद्रप्रमुख लक्ष्मण ईद्दे व मुख्याध्यापिका कुं दांडेकर यांनी अभिनंदन केले आहे.