वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या जप्त

गांधीचौक, टिळक चौक येथे वाहतूक शाखाची कारवाई

जितेंद्र कोठारी, वणी: येथील मुख्य बाजार गांधी चौक येथे रस्त्याच्या मध्यभागी हातगाड्या उभी करून फळ भाजी विक्री केली जाते. त्यामुळे या भागात नेहमी वाहतुकीची कोंडी होत असतात. तसेच अपघात होण्याचा धोका देखील निर्माण होतो. अनेकदा कारवाई करूनसुद्धा परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विरुद्ध शुक्रवारी स्थानिक वाहतूक शाखा व नगरपरिषद तर्फे संयुक्त मोहीम राबविण्यात आली. वाहतूक शाखेचे नवनियुक्त प्रमुख एपीआय मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात टिळक चौक व गांधी चौक परिसरात कारवाई करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या जप्त करण्यात आली. तर रस्त्याच्या बाजूलाच दुकाने थाटून फळभाजी व इतर व्यवसाय करणाऱ्या दुकाने मागे घेण्याची सूचना देण्यात आली.

वणी शहरात वाहतूक कोंडी व अतिक्रमणमुळे बहुतांश रस्त्यांचा श्वास गुदमरतोय. घराच्या बांधकामासाठी आणलेले गिट्टी, रेती, विटा, सेंटरिंग इत्यादी साहित्य अनेक ठिकाणी रस्त्यावर टाकून आहे. त्यामुळे टिळक चौक पासून सरोदय चौक, खाती चौक, वरोरा रोड या ठिकाणी वाहतूक ठप्प होत आहे. जटाशंकर चौक, टिळक चौक, बस स्थनाक समोर व साई मंदिर परिसरात ऑटो चालकांची मनमानी वाढली असून रस्त्याच्या मध्ये ऑटो उभे करून प्रवासी भरले जाते.

वणी नगर परिषदमध्ये कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अतिक्रमणसह अनेक समस्या नागरिकांना भेडसावत आहे. नवनियुक्त वाहतूक शाखा प्रमुख सपोनि मुकुंद कवाडे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी अशी मागणी वणीकर नागरिक करीत आहे.

Comments are closed.