मांगलीतील अचानक अंधत्व आलेल्या तरुणाला आर्थिक मदत

ग्रामपंचायत व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सरसावली मदतीला

सुशील ओझा, झरी: घरातील कर्ती व्यक्तीवर अचानक अंधत्व आल्यामुळे मांगलीतील टेकाम कुटुंबीय आर्थिक अडचणीत आले होते. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत मांगली व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना पुढे सरसारवली व त्यांनी टेकाम कुटुंबीयांना 5 हजारांची आर्थिक मदत केली.

तालुक्यातील मांगली येथील रहिवासी असलेला 26 वर्षीय कैलास टेकाम हा मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा. मात्र काही दिवसांपूर्वी अचानक दृष्टी गेली. कैलासच्या वडीलांची दृष्टी देखील अधू आहे. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी कैलासच्या आईवर आली. कैलासची आई मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

टेकाम कुटुंबाची ही परिस्थिती मांगली ग्रामपंचायत व ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांना मिळाली. त्यांनी तातडीने सरसाई व ग्रामपंचायत कडून 3 हजार व संघटनेकडून 2 हजार अशी मदत केली. मात्र अद्याप घरातील कर्ती व्यक्ती अंध झाल्याने टेकाम कुटुंबीयांसमोर जगण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कैलासच्या उपचाराकरिता सामाजिक, राजकीय संघटना तसेच दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मदतीसाठी सरपंच रेखा ढाले, उपसरपंच श्यामसुंदर चामाटे, महेंद्र कांबळे, शशिकला धकाते, सुमन भादिकर, सुशीला सातघरे, मामा कसोटे, आकाश मडावी तर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय गिलबिले, गणेश मुके, मनोज दासरवार, कैलास जडगव, देविदास अडपावर, आर डी पाटील, प्रकाश बलीद, गवारकर, सय्यद युनूस, अक्षय सिरतावार, संदावार, निशा घाटोळे, प्रांजली वाढई, निलेश मसराम, माधुरी पोयाम यांनी हातभार लावला.

हे देखील वाचा:

घरफोडी करणा-या 3 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

श्रावणी गणेश मूर्ती मॉलमध्ये मातीच्या मूर्ती उपलब्ध

Comments are closed.