सुशील ओझा, झरी: तालुक्यात सध्या रेतीचोरी मोठ्या प्रमाणात सुरू असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तालुक्यातील खुनी नदीच्या पात्रातून उत्खनन करून ट्रॅक्टर द्वारे रेतीचोरी सुरू आहे. मांडवी ते गवारा मार्गावर अश्याच प्रकारची रेतीचोरी करून ट्रॅक्टर द्वारे रेती भरून घेऊन जात असताना पाटण च्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांना 24 मे रोजी सकाळी 7. 30 वाजता आढळून आला.
रेती भरलेला ट्रॅक्टर ठाणेदार यांनी थांबवून रॉयल्टी बाबत विचारपूस केली असता जिल्हाधिकारी यांची रेती वाहतूक बाबत कोणतीही परवानगी नव्हती. ठाणेदार यांनी रेती भरलेला ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये लावून आरोपी आशिष मारोती पवार वय 20 वर्ष रा. बोरी याच्यावर कलम 379,188 अंतर्गत गुन्हा दाखल करून 1 ब्रास रेती किंमत 4 हजार व ट्रॅक्टर किंमत 3 लाख असा एकूण 3 लाख 4 000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिमान आडे करीत आहे.
हे देखील वाचा: