सुशील ओझा, झरी: तालुक्यातील साखरा गावाजवळील नाल्यातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणा-या ट्रक्टर जप्त केला. या प्रकऱणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला अटक करण्यात आली असून आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकऱणी पोलिसांनी 5 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मंगळवारी दिनांक 10 ऑगस्ट रोजी मुकुटबन ठाण्यात पोलिसांना मोबाईलवरून साखरा गावाजवळील नाल्यातून रेतीचोरी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरून सहाय्यक फौजदार अनुल सकवान, प्रवीण ताडकोकुलवार, जितेश पानघाटे व मंगेश सलाम हे आपल्या दुचाकीने पोचले. ट्रॅक्टर येण्याच्या मार्गावर आदर्श हायस्कूलजवळ त्यांनी फिल्डिंग लावली.
12.30 वाजताच्या सुमारास रेती भरलेला येताच पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला रायल्टीची विचारण केली. मात्र त्याबाबत कोणताही परवाना ट्रॅक्टर चालकांजवळ नव्हता. पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टर पोलीस स्टेशनला लावले. चालक प्रवीण आदे (31) याला अटक केली. या प्रकऱणी 1 ब्रास रेती ज्याची किंमत 6 हजार रुपये व महिन्द्रा कंपनीचा विना नंबर ट्रॅक्टर व ट्रॉली क्र. MH29 AK 5099 किंमत 5 लाख असा एकूण 5 लाख 6 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी विरोधात भादंविच्या कलम 379, 188 सहकलम 48 म.ज.म. कायदा व सहकलम 15 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम सहकलम 130 (1) 177, 139/177 व सह कलम 48 महाराष्ट्र महसूल कायदा व सहकलम 15 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम सहकलम-130 (1)/177,139/177 मोवाका प्रमाने गुन्हा नोंद करण्यात आले. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
हे देखील वाचा:
वणीतील पहिल्या फॅशन व इंटेरिअर इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश सुरू