महिलांनी घेतले स्वयंरोजगाराचे धडे

वणीत स्वयंरोजगार व कायदेविषय मार्गदर्शन शिबिर संपन्न

0

विवेक तोटेवार, वणी: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वणीमध्ये रविवारी 10 मार्चला महिलांसाठी कायदेविषयक सल्ला व लहुउद्योग प्रशिक्षण घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. दुपारी एक ते चार वाजताच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात हे शिबिर संपन्न झाले. यात सुमारे 100 महिलांनी सहभाग घेतला. या महिलांना विविध गृहउद्योग तसेच लायटिंग बाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार ख्वाजा बेग यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीदेखील महिलांना मार्गदर्शन केले.

Podar School 2025

या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. प्रीती लोढा यांनी केले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा होते. अनेक महिलांना कायद्याची विशेष माहिती नसते. हेच कारण महिलांच्या प्रगतीला बाधा आणते. शिवाय अनेक प्रकरणामुळे महिलांना कायद्याचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे महिलांना कायदेविषयक माहिती मिळावे तसेच महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या, त्यांनी घरीच छोटा मोठा उद्योग सुरू करावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिबिरार्थ्यांना ऍड विजयाताई मांडवकर यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले तर भावना नवाते, प्रज्ञा नरवाडे व चंद्रपूर येथील लघुउद्योग विभागातील राजेश डोंगरे यांनी महिलांना स्वयंरोजगाराचे धडे दिले. उद्घाटन प्रसंगी बोलताना कार्यक्रमाच्या उद्घाटक डॉ. प्रीती लोढा म्हणाल्या की महिलांनी केवळ चूल आणि मुल पुरतं मर्यादीत न राहता आता महिलांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनणे काळाची गरज आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. महेंद्र लोढा म्हणाले की केवळ प्रशिक्षण देणे इतकेच आमचे काम उद्दीष्ट नसून महिला स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उभ्या राहिल्या पाहिजे. इथे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना स्वरोजगारासाठी किंवा गृहउद्योगासाठी जी काही मदत लागेल ती सर्व मदत येत्या काळात केली जाणार आहे. महिलांचा लघू उद्योजक बनवणे हे येत्या काळातले ध्येय असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही डॉ. महेंद्र लोढा यांनी दिली.

संगीता खटोड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर संचलन विजयाताई आगबत्तलवार केले. हेमलता लामगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अर्चना मनोहरे, ज्योती मिश्रा, पूजा गडवाल, मंदा तामगाडगे, सुषमा मोडक उज्वला दानवे, रंजना एकरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.