पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना निरोप

बुलढाणा येथे झाली बदली

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांनी बुलढाणा येथे बदली झाली असून त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पोलीस स्टेशन मध्ये घेण्यात आला. पोलीस निरीक्षक राठोड दोन वर्षांपासून मुकुटबन ठाण्यात कार्यरत होते. जनसामान्यांमध्ये त्यांची निष्पक्ष अशी प्रतिमा होती. मुकुटबन ठाण्यात एका महिन्यात 5 ते 6 बाल लैंगिक अत्याचारासह इतर गुन्हे दाखल झाले. त्याचा सुद्धा तपास त्यांनी योग्यरीत्या केला.

मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये 29 ऑगस्टला दुपारी 12 वाजता निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. ठाणेदार अजित जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांच्या बाबत उपस्थित सहका-यांनी मनोगत व्यक्त केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यावेळी सहाय्यक फौजदार शशिकांत नागरगोजे, प्रवीण तालकोकुलवार, जितेश पानघाटे, अशोक नैताम, खुशाल सुरपाम, महिला कर्मचारी लता शेंडे, निलेश चौधरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी यांच्यासह पोलीस कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

Comments are closed.