अडेगाव ते खडकी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी अनोखे आंदोलन

उद्यापासून खड्यात बसून होणार आंदोलन

सुशील ओझा, झरी: जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव- खडकी-गणेशपुर या परिसरात मोठ्या खदानी सुरू आहे . खदानीचे वाहतूक खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याने सुरू आहे. परिसरात जगती मिनरल्स, ईशान मिनरल्स, सूर्या मिनरल्स, गुंडावार मिनरल्स, मोनेट इस्पात, व इतर गिट्टी खदानीचे वाहतूक अडेगाव रस्त्याने सुरू आहे.

रस्त्याची मर्यादा दहा टनची असताना या रस्त्यावरून खदानीतुन जड वाहतूक सुरू आहे. यामुळे अडेगाव -खडकी रस्ता संपूर्ण खराब होऊन खड्डे पडले आहे. याबाबत प्रशासनाला वारंवार पत्र व्यव्यार करून सुद्धा प्रशासन या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. जड वाहतूकीमुळे संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. रस्ता दुरुस्ती बाबत अनेकदा मागण्या करून सुद्धा रस्ता न झाल्याने अडेगाव येथील मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात सोमवारी दि 30 ऑगस्ट पासून खडकी बस स्थानकाच्या बाजूला अनोखे खड्यात उपोषण करण्यात येणार आहे

उपोषणात दुसऱ्या दिवशी जिल्हा अधिकारी यांना रक्ताने पत्र, तिस-या दिवशी मुंडन आंदोलन, चौथ्या दिवशी रास्ता रोको व त्यानंतर उपोषण कऱण्यात येणार आहे. प्रशासन याकडे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उपोषणात अडेगाव येथील राहुल ठाकूर, दत्ता लालसरे, गिरीधर राऊत, दिनेश जीवतोडे, निखिल देठे, दत्ता भोयर व इतर उपोषण कर्ते राहणार आहे.

हे देखील वाचा:

पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड यांना निरोप

विष प्राशन केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू

Comments are closed.