जितेंद्र कोठारी, वणी: ‘वणी बहुगुणी’ने शहरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटवर सिरिज सुरु केल्यानंतर सेक्स रॅकेट चालकांचे धाबे दणाणले आहे. वणी शहराच्या पूर्व व पश्चिम दोन्ही दिशेच्या सेक्स रॅकेट चालकांनी आता जुने ठिकाण सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याने नवीन जागेची चाचपणी सुरू केली आहे. यातच एक चालक लालगुडा भागातील एका बंगल्याची चाचपणी करत असल्याची माहिती आहे. या रॅकेटमध्ये शहरात खेड्यापाड्यातून शिकण्यासाठी आलेल्या मुलींना पैशाचे आमिष दाखवून ओढले जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. तसेच या मुलींना परदेशी मॉडलसारखे किंवा पॉर्नस्टार सारखे दिसावे यासाठी सेवेच्या वेळी फॅशनेबल अंतर्वस्त्रे परिधान करायला लावून पाठवले जाते अशी देखील माहिती आहे.
भालर येथील दलालाचे वणीतील एका दक्षिण भारतीय अण्णासोबत साटेलोटे आहे. त्याच्या प्रतिष्ठानाचा या कामासाठी चांगलाच उपयोग केला जातो. हे दोघे शहरात आजुबाजुच्या परिसरातून शिकण्यासाठी आलेल्या गरीब घरच्या सुंदर मुलींना हेरतात. त्यानंतर त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना व्यवसायाबाबत माहिती दिली जाते. कुणाला संशय येऊ नये म्हणून या अण्णाच्या दुकानात देखील अनेकदा मुली दाखविल्या जात असल्याची माहिती आहे. एखाद्या ग्राहकाने मुली पसंत केल्यावर हे दलाल पुढच्या प्रक्रियेच्या कामी लागतात.
मुलींना परदेशी मॉडेलसारखे केले जाते तयार
खेड्यातील बहुतांश मुली या साध्या राहणीमानाच्या असतात. ग्राहकांने पसंत केल्यावर हे दलाल मुली फॅशनेबल, सुंदर व शहरातील दिसावे त्यासाठी त्यांना ब्युटीपार्लरमध्ये फेशियल, थ्रेडिंग व मेकअप करून नटवतात. त्याच मेकअपमध्ये त्यांचे फोटोशूट देखील केले जाते. हे फोटो त्यांना सोशल मीडियावरून ग्राहकांना पाठवण्यासाठी कामी येतात. विशेष म्हणजे मेकअप करून तयार केल्यानंतर मुलगी ही परदेशी मॉडेल किंवा पॉर्न स्टारसारखी दिसावी यासाठी तिला परदेशी फॅशनचे अंतर्वस्त्रे घालून ग्राहकांच्या सेवेसाठी पाठविले जाते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
खेड्यातील अनेक मुलींनी शहरात शिक्षण किंवा इतर कामासाठी रूम भाड्याने घेऊन राहतात. जाळ्यात ओढलेल्या मुलींची खोली देखील या कामी आणली जाते. दलालाने देखील शहरात दुस-यांच्या नावे रूम भाड्याने घेतलेल्या आहे. अशी जागा सेक्स रॅकेटसाठी वापरली जाते. यासह इतर ठिकाणचे घर व हॉटेलचा देखील जागा म्हणून उपयोग केला जातो. शहरातील भाड्याने केलेल्या रूमबाबत शेजा-यांच्या तक्रारी वाढू नये म्हणून या रूम दर दोन महिन्याला बदलवण्याची खबरदारी दलाल व रॅकेट चालक घेतात.
शहरात पुण्यातील कॉलगर्लचा मुक्काम ?
परिसरात सेक्स रॅकेटमधील दलाल म्हणून प्रसिद्ध असलेली ही व्यक्ती इतर सेक्स रॅकेट चालकांनाही मुली पुरवत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे हा धंद्याला सुरक्षा मिळावी यासाठी त्याने आपल्या चारचाकी वाहनांवर एका राजकीय पक्षाचे चिन्हसुद्दा लावल्याची चांगलीच चर्चा आहे. वणी-घुग्गुस परिसरात सुरू असलेल्या एका देहविक्री अड्ड्यावर पुणे येथील 5 ते 6 कॉलगर्लचे तब्बल दोन तीन आठवडा मुक्कामी असल्याची माहिती आहे. या दरम्यान वरोरा पर्यंतच्या ग्राहकांना सेवा पुरविण्यात आल्याचे सांगण्यात येते.
हे देखील वाचा: