कर्जमाफीच्या मागणीसाठी घोंसा-वागदरा शेतकऱ्यांचा एल्गार
कर्जमाफी न झाल्यास तीव्र आंदोलन – कॉम्रेड सुहास झाडे
बहुगुणी डेस्क , वणी: नागपूर येथे झालेल्या एल्गार मोर्चाच्या दबावामुळे राज्य शासनाने ३० जून २०२६ पर्यंत संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य किसान सभेने सध्या आंदोलन स्थगित केले आहे. या मोर्चात घोंसा-वागदरा जि.प. क्षेत्रातून भाकप व मित्रपक्षाचे उमेदवार कॉम्रेड सुहास झाडे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी सहभागी झाले होत
येथील शिवाजी महाराज चौकात झालेल्या प्रदर्शनात कॉम्रेड सुहास झाडे यांनी सरकारला कडक इशारा दिला की, ठरलेल्या मुदतीपर्यंत संपूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा केला नाही, तर महाराष्ट्र राज्य किसान सभा पुन्हा शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन छेडेल. तसेच घोंसा-वागदरा गटात शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व जनतेच्या न्यायासाठी लाल झेंडा नेहमी संघर्ष करीत राहील. भाकपला या गटात विजय मिळाला, तर जिल्हा परिषदेतून सर्व प्रकारच्या योजना जनतेसाठी खेचून आणू, असे आवाहनही त्यांनी केले.
या एल्गार मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी नीलेश झाडे, रवींद्र ढेंगळे, नितीन ढेंगळे, वसंता पानघाटे, मारोती दरेकर, अमोल वाभीटकर, प्रमोद गाढवे, दयानंद गोरे, प्रवीण झाडे, ज्ञानेश्वर झाडे, गुलाब डाहुले, योगेश झाडे, गजानन बोधाने, ईश्वर मुसळे, रमेश विधाते, रूपेश झाडे यांच्यासह घोंसा-बोर्डा क्षेत्रातील शेकडो शेतकरी उपस्थित होत


Comments are closed.