मुकूटबन येथे शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे आयोजन

शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

0

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) द्वारा शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे आयोजन मुकूटबन येथील बालाजी मार्केट यार्डात १०.३० वाजता करण्यात आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना भरभरीत उत्पादन होण्याच्या उद्देशाने तसेच खरीप हंगामातील मुख्य पिकावरील होणारे कीड यांच्यावर मात करण्याकरिता त्याचे व्यवस्थापन तसेच कपाशी पिकावरील शेंदरी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापन करण्याची माहिती व फवारणी करतांना शेतकऱ्यांनी कोणत्या काळजी घ्याव्या याबाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाख्रवण्यात आल्या.

फवारणी करताना अनेक शेतकऱ्यांना विषबाधेमुळे जीव गमवावे लागले. शेतीविषयक योग्य माहिती नसल्याने शेती उत्पादनात मोठी घट तसेच पिकांवर विविध रोगामुळे पिकांची नुकसान होते. ज्यामुळे शेतकऱ्यांना सावकारी फासात अडकावे लागत आहे. शेतकऱ्यांना कुटुंब जगविणे कठीण झाले आहे. मुलामुलींचे लग्न करणे कठीण झाले.

या सर्व गोष्टींवर मत करण्याकरिता शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले.सदर प्रशिक्षणात शेतकऱ्यांनी फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी तसेच कोणत्या औषधीचे वापर करावे याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली. प्रमुख पाहुणे डॉ मगरे,डॉ नेवाडे, गगन राठोड,शिंदे,अनिल पोटे, चक्रधर तीर्थगिरीकर, विजय कोठारी,अनिल पावडे व अशोकरेड्डी बोदकुरवार उपस्थित होते .प्रशिक्षण केंद्रात तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.