शिक्षक दिनानिमित्त शाळा क्रमांक ७ मध्ये स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी घेतली शिक्षकांची भूमिका, व्यक्त केल्या भावना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगर परिषद शाळा क्रमांक ७ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने स्वयंशासन दिन हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमात इयत्ता सहावी आणि सातवीचे विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून वर्गात अध्यापन केले. त्यानंतर मुख्याध्यापक गजानन कासावार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिनाचा मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे पदवीधर शिक्षक चंदू परेकर, शुभांगी वैद्य, मंगला पेंदोर आणि विजय चव्हाण प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

स्वयंशासन दिनाच्या उपक्रमात आराध्या निंबाळकर, दुर्गा भोरे, जोबिया परवीन जुबेर शेख, खुशी असलम शेख, मयंक सुनील मडावी, प्रेम सतीश बुरडकर, सिद्धांत तुराणकर, स्वरूप ढाले, वैष्णवी बघेल, अदिती सरोदे, अक्षय महाजनवार, अरेन्सी बघेल, आर्यन निंदेकर, आर्यन धांडे, हर्षाली कळसकर, महेश चौधरी, राज पंधरे, सार्थक लाटकर, शारदा धांडे, वेदिका आडे आणि यश बुरडकर यांनी सहभाग घेतला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यानंतर, शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात उन्नती कुमरे, रितविक चांदेकर, ज्ञानेश्वरी शिखरे, सार्थक लाटकर, वेदिका आडे, वैष्णवी बघेल, शिव गुप्ता, सई ढेंगळे, भूषण देऊळकर, माही निंदेकर, संस्कार कुंभारे, माही भंडारे, आरोही बघेल, रिधान्त कुंभारे आणि हर्षल क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.

शिक्षकांच्या योगदानाला सलाम
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या प्रतिसादावरून शिक्षकांचा दर्जा ठरतो. आयुष्यातील आनंदाच्या क्षणी किती विद्यार्थी आपल्या शिक्षकांना आठवणीने बोलावतात, यावरून शिक्षकांना स्वतःचे मूल्यमापन करता येते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी केले, तर दिगंबर ठाकरे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. शेवटी, आकांक्षा उईके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments are closed.