शिंदोला गावच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे किशोर किनाके

नवरगाव येथे विलास नक्षणे, तर अहेरी येथे भिमा नगराळे उपसरपंचपदी

0

शिंदोला: वणी तालुक्यातील शिंदोला ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड गुरुवारी पार पडली. यात शिवसेनेचे किशोर किनाके विजयी झाले. तर नवरगाव येथे नक्षणे पॅनलचे विलास नक्षणे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे तसंच अहेरी येथे भिमा नगराळे यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.

Podar School 2025

वणी तालुक्यातील शिंदोला ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. ९ सदस्यीय ग्रामपंचायतीत शांतीलाल जैन, लुकेश्वर बोबडे, मुरलीधर ठाकरे यांच्या नेतृत्वातील किसान मजदूर आघाडीचे विठ्ठल बोन्डे सरपंचपदी निवडून आले. तर ३ सदस्य विजयी झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी शेतमजूर पॅनलचे ६ सदस्य विजयी झाले. थेट जनतेतून निवड झालेल्या सरपंच पदी विठ्ठल बोन्डे आरूढ झाले. मात्र उपसरपंच पदाच्या निवडीसाठी किसान मजदूर आघाडी कडून प्रितम बोबडे यांनी तर शेतकरी शेतमजूर पॅनल कडून किशोर किनाके यांनी नामांकन दाखल केले होते.

यावेळी पार पडलेल्या निवड प्रक्रियेत किशोर किनाके यांना ६ मते तर प्रितम बोबडे यांना ३ मते मिळाली. अखेरीस उपसरपंचपदी शिवसेनेचे किशोर किनाके विजयी झाले. निवड प्रक्रिया शांततेत पार पडली. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.

 

Leave A Reply

Your email address will not be published.