विवेक तोटेवार, वणी: खासगी वाहनातून चंद्रपूर जिल्ह्यात जाणारी दारू पकडली. मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास शिरपूर पोलिसांनी ही कारवाई केली. या इंडीगो कारमधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली.
वणी तालुक्यातील लाठी मार्गे चंद्रपूरकडे दारूची तस्करी होत असल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. ठाणेदार दीपक पवार नाकाबंदी करीत असताना एक संशयित इंडीका (एमएच ३२ सी ४९९१) आढळली. नाकाबंदी दिसतास गाडीच्या ड्रायवरने मार्ग बदलवला. मात्र ठाणेदार दीपक पवार यांनी संततधार पावसात पाठलाग करून या गाडीला गाठले.
गाडीची तपासणी केल्यावर यातून अवैधरीत्या चंद्रपूर जिल्ह्यात देशी व विदेशी दारू नेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी वाहनात ३५ पेटी देशी आणि गाडी असा एकूण 1 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी शिवा रायपुरे (२८), पुंडलिक ठावरी (२१) व ईश्वर गड्डीवार (१९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. तर मुख्य आरोपी सोनू जयस्वाल सध्या फरार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार दीपक पवार करीत आहेत.