अपघातास कारणीभूत ठरणा-या कंपनीवर गुन्हे दाखल करा

तहसीलदार आणि ठाणेदारांना निवेदन

0

रोहन आदेवार, मारेगाव: मारेगाव येथील चौपदरी रस्त्याच्या मध्ये दुभाजक उभारण्यात आला आहे. या दुभाजकाच्या बाजुला चार ते पाच फुटांचे खोलीकरण
करण्यात आले आहे. त्यामुळे इथे अनेक छोटेमोठे अपघात झाले आहे. याला आयवीआरसीएल ही कंपनी जबाबदार असून या कंपनीवर गुन्हे दाखल करावे अशी
मागणी मारेगाव येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

घुग्गुस ते करंजी या राज्य महामार्गावर चौपदरीकरण करण्यात आले आहे. दुतर्फा वाहतूक करण्यासाठी दुभाजकाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कार्य
आयवीआरसीएल कंपनीद्वारे करण्यात आले आहे. या कंपनीकडून याकामाचा करंजी जवळ टोल देखील आकारला जातो. मात्र मारेगावमध्ये दुभाजकाच्या जवळ चार ते पाच फुटांचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे इथे जनावरे पडून अनेक शेतक-यांचे नुकसान झाले आहे. तसेच अनेक छोटे अपघात झाले आहेत.

यासाठी आयवीआरसीएल ही कंपनी जबाबदार असून त्यांनी कामात कसूर ठेवल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप करत मारेगाव येथील मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीवर गुन्हे दाखल करून दुभाजकाचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे. जर कार्यवाही करण्यात आली नाही तर करंजी येथील टोलनाका बंद पाडू असा इशारा देखील मनसेने निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.