शिरपूर येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा
वेशभूषा स्पर्धा व नंदी सजावट स्पर्धा ठरली प्रमुख आकर्षण
बहुगुणी डेस्क, शिरपूर: शिरपूर येथे तान्हा पोळ्याच्या निमित्ताने सोमवारी नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे दोनशे चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यावेळी चिमुकल्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून उपस्थितांचे लक्ष वेधले.
तान्हा पोळा हा चिमुकल्यांचा सण. या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणीत व्हावा या उद्देशाने तंटामुक्त समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. नंदी सजावट स्पर्धेत 90 तर वेशभूषा स्पर्धेत 100 स्पर्धक सहभागी झाले होते. गांधीजी, शंकरजी, संत गाडगेबाबा, राणी लक्ष्मीबाई, संत तुकडोजी महाराज, वासूदेव इत्यादी वेशभूषांनी उपस्थितांचे मन जिंकले. तर कुणी फुलं, कुणी रंगबिरंगी तोरण, कागदाची फुलं, रंग इत्यादींं सजावटीच्या साहित्याने नंदीची सजावट केली होती.
नंदी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक ऋषीकेश डाहुले, द्वितीय क्रमांक नक्ष गिलबिले, तर तृतिय क्रमांक तुषार मत्ते यांनी पटकावला. तर वेशभूषा स्पर्धेत मोहित कुडमेथे याने प्रथम, भारत चामाटे याने द्वितिय तर ओम बोते यानी तिसरे बक्षित पटकावले.
या स्पर्धेच परिक्षण शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते रुद्रा कुचनकर व गुरुदेव महाविद्यालय शिरपूरचे प्राचार्य विनोद ताजणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सरपंच मिनाक्षी कनाके, उपसरपंच सुभाष नीर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश मत्ते, पोलीस पाटील सुवर्णा बोंडे, रवि वाभिटकर, पवन घोंगे, सतिष बोंडे, धीरज डाहुले तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि तंटामुक्त समितीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.