सावंगीत शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात

शोभायात्रेने वेधले ग्रामस्थांचे लक्ष

0

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील सावंगी लहान येथे शिवजन्मोत्सव युवा मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि.१८ सोमवारी सायंकाळी सावंगी लहान आणि मोठी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्दघाटन माजी जी.प.सदस्य विजय पिदूरकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी चंपतराव ठाकरे होते.

Podar School 2025

प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच प्रवीण पिदूरकर, उपसरपंच माधव ढवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमान पायघन, पुंडलिक वाघमारे, एकनाथ ढवस, नानाजी ढवस, सुरेश ठाकरे, धनराज राजगडकर, माधव तु. ढवस, महादेव तुराणकर उपस्थित होते. याप्रसंगी पुलवामा येथिल दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना सामूहिक श्रद्धांजली वाहिली. सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एकल नृत्य, समूह नृत्य, लघुनाट्य सादर केले. संचालन शिक्षक सुरेश काटेखाये यांनी केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दि.१९ मंगळवारी शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त सकाळी गावातून बँडपथकासह शोभायात्रा काढण्यात आली. शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान केलेला बालक, जिजाऊ माता, हातात भगवे झेंडे घेऊन शिवगर्जना करणारे तरुण आदी देखाव्यांनी आबाल वृद्धांचे लक्ष वेधून घेतले. चौकाचौकात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. दुपारी शिवश्री दत्तूजी डोहे यांचे व्याख्यान झाले. सायंकाळी डॉ. विलास बोबडे यांच्या सौजन्याने चंद्रपूर येथील प्रा. पुरुषोत्तम टोंगे यांचे ‘रहस्य जीवनाचे’ हे मानसशास्त्रीय व्याख्यान पार पडले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यशस्वीतेसाठी हेमंत ढवस, महेंद्र बोबडे, चंद्रकांत चिंचोलकर, विठ्ठल पाचभाई, प्रशांत बोबडे, आशीष ढवस, शंकर ढवस, चंद्रकांत बोबडे,सुरज ठाकरे, अक्षय बोबडे, निलेश बोबडे, विकास ढवस, प्रकाश डाहुले, विकास दातारकर, मिलिंद ढवस, अरविंद धगडी, अमोल पाचभाई, उमेश ढवस आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.