वाईगौळ व शेंदुरजना येथे स्तनदा व गरोदर माता तपासणी शिबिर

डॉ. श्याम जाधव आणि चमुंनी केली रुग्णांची तपासणी

0 615

मानोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील वाईगौळ व शेंदुरजना येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मानव विकास मिशन अंतर्गत नुकतेच कुपोषीत बालक, स्तनदा माता व गरोदर माता तपासणी शिबीर पार पडले. वाईगौळ येथे 47 गरोदर माता, 12 स्तनदा माता व 48 बालकांची तपासणी करण्यात आली तर शेंदूरजना अढाव येथे 40 गरोदर माता, 07 स्तनदा माता व 30 बालकांची तपासणी करण्यात आली तसेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. तसेच रुग्णांना मोफत औषधीचे वितरणी करण्यात आले. आरोग्यधाम हॉस्पीटल ॲन्ड क्रिटीकल केअर सेंटर दिग्रसचे संचालक तथा सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.श्याम जाधव व त्यांच्या चमुने रुग्णांची तपासणी केली.

वाईगौळ आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सागर जाधव, बालरोग तज्ज्ञ डॉ. राहूल पाटील, डॉ. अनिरूध्द जाधव, डॉ. रंजीता जाधव, आदींनी कुपोषीत बालक व गर्भवती रूग्ण व मातांची तपासणी केली. तर शेंदुरजना आरोग्य उपकेंद्रातील शिबिरात वैद्यकिय अधिकारी डॉ. बी. एन. खंडारे, बालरोग तज्ज्ञ डॉ.राहूल पाटील आदींनी रुग्णांची तपासणी केली.

याप्रसंगी रुग्णांना मार्गदर्शन करताना डॉ. श्याम जाधव म्हणाले की…
गरोदरपण ही स्त्रीच्या जीवनातील एक फार महत्त्वाची अवस्था आहे. गरोदरपणात व्यवस्थित काळजी घेतल्यास आई व मूल या दोघांचे आरोग्य सांभाळले जाते. सध्या उन्हाळयाची चाहूल लागत असून या काळात गर्भवती मातांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. तसेच कुपोषीत बालकांना सकस आहार देणे आवश्यक आहे. असेही डॉ. श्याम जाधव म्हणाले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाचे जतकर, आरोग्य सहायक इकडे मॅडम, संजय क्षीरसागर, महेश खरे, के.पी.काळे, जे. एस. झळके रवींद्र दाभाडकर,आरोग्य सहायक के. के.डोंगरे, एस.एम.भोयर, एस.पी.गोटे, कु. नेमाने यांसेचह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Comments
Loading...