जब्बार चीनी, वणी: तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमाद्वारे शिवजयंती साजरी करण्यात आली. वणीतील देशमुखवाडी व चिखलगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तर धनोजे कुणबी समाज येथे छत्रपती महोत्सव अंतर्गत व्याखान आयोजित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्ह्यात लॉकडाऊनचे अनेक नियम लागू करण्यात आल्याने रॅली व जाहीर व्याख्यान रद्द करून त्याऐवजी साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात आली.
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शहरात शिवतीर्थावर शेकडो शिवप्रेमी गोळा झाले. यावेळी जय भवानी, जय शिवाजी या जयघोषाने व ढोलच्या गजराने परिसर निनादूण गेला. उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. संध्याकाळी शिवतीर्थावर प्रवीण देशमुख यांच्या व्याख्यानाचा जाहीर कार्यक्रम होता. मात्र लॉकडाऊनच्या नवीन नियमांमुळे हा कार्यक्रम धनोजे कुणबी सभागृह येथे घेण्यात आला. 50 लोकांच्या उपस्थितीत या ठिकाणी व्याख्यान पार पडले.
चिखलगाव व देशमुखवाडीत रक्तदान शिबिर
रॅली टाळून सामाजिक उपक्रम घेऊन शिवजयंती साजरी करावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. त्यामुळे वणीतील देशमुखवाडी व चिखलगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. देशमुखवाडी येथे नामदेवराव ताटकोंडावार यांच्या शुभहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिकेत चामाटे यांनी केले. यावेळी हेमंत मालेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी अनिल ढगे, महेश हजारे, जयंद्र निखाडे, स्वामिनी कुचनकर, अर्चना उपासे, प्रेरणा काळे, पवन काळे, नितीन कुमरे इत्यादींची उपस्थिती होती.
चिखलगाव येथे शिव छञपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी संजय पिंपळशेंडे, उपसरपंच अमोल रांगणकर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन रक्तदान शिबिरास सुरवात करण्यात आली. यावेळी अनेकांनी रक्तदान केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले.
हे देखील वाचा: