शिंदोला, येनक, परमडोह, हनुमाननगर परिसरात शिवजयंती साजरी

0

विलास ताजने, वणी : शिंदोला परिसरातील येनक, परमडोह आणि हनुमान नगर  येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने ग्रामस्वच्छता करण्यात आली. रस्ते रांगोळ्यांनी सजविण्यात आले.

येनक येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच तातोबा बोंडे, प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ बोबडे, पांडुरंग पंडिले, पोलीस पाटील संतोष सोनटक्के, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल देवतळे, उपसरपंच सतीश शेंडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी विलास शेरकी यांनी शिवाजी महाराजांचे जीवनकार्य भाषणात मांडले. वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली. विकास चिडे गुरुजी यांचे प्रबोधनपर कीर्तन पार पडले. संचालन रवींद्र पांगूळ यांनी केले.

यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष वैशिष्ठ पंडिले, उपाध्यक्ष रत्नाकर आत्राम, सचिव राकेश कोट्टे, संकेत बोन्डे, विकास खामनकर, वतन टेकाम, आकाश धोटे, ललित बोबडे, प्रेम गारघाटे, मनोज ढवळे, अजय घुगुल, अंकुश गोहोकार, अजय टेकाम, गजानन थेरे, सुशांत कोट्टे, आशीष गारघाटे आदींनी परिश्रम घेतले.

परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप थेरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक काटकर, शिक्षक नीलेश सपाटे उपस्थित होते. याप्रसंगी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला.

तर हनुमान नगर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव बानकर होते. यावेळी पुलवामा येथिल दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी बीएसएफचे जवान संतोष बानकर यांचे आई, वडील आणि पत्नीचा ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. यशस्वीतेसाठी विनोद उईके, राकेश चौधरी,सचिन नाकाडे, गणेश कोडापे, सुधाकर खेडेकर, राजू अहिरकर, गणपत निमकर, राजू, निमकर, सदाशिव गावंडे, रवींद्र पांगूळ, राजेश गोरे यांनी सहकार्य केले.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.