संत रविदास महाराज व शिवजयंती उत्साहात

0

बहुगुणी डेस्क, वणीः संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येथील तहसील कार्यालयात उत्साहात साजरी झाली.

शासकीय परिपत्रकानुसार महामानवांच्या जयंती साजऱ्या करण्याचे आदेश आहेत. संत रविदास महाराजांची जयंतीदेखील साजरी व्हावी म्हणून संत रविदास चर्मकार युवा मंचाने विनंती केली होती.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तहसीलदार धनमने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जयंती सोहळा झाला. यावेळी तहसीलदारांनी महामानमांच्या विचारांवर भाष्य केलं. आपले महामानव हे सदैव प्रेरणादायी असल्याचं ते यावेळी म्हणाले.

या जयंती सोहळ्यााला आत्राम, सर्कल प्रमुख कुमरे, बदखल, तलाठी मंजू तरवरे, षिपाई प्रषांत केाहळे, आयोजन समितीचे विनोद ढेरे, किशोर हांडे, किशन कोरडे आणि संत रविदास युवा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.