औचित्य शिवजयंतीचा.. आणि गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

शिवजयंतीनिमित्त हिवरी गावातील युवकांनी राबविला आजादी का अमृत महोत्सव

जितेंद्र कोठारी, वणी : स्वातंत्र्याचे 75 वर्षपूर्ती निमित्त संपूर्ण देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. आणि नेमके हेच औचित्य साधुन मारेगाव तालुक्याचे हिवरी गावातील युवकांनी शिवजयंती निमित्त गावातील 75 वर्षाच्या नागरिकांचा सत्कार करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

देशात विविध क्षेत्रामध्ये नाविन्य प्राप्त असलेल्या नागरिकांचा सत्कार होत असतो. परंतु देशाचा अमृत महोत्सवानिमित्त गावातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करणारा हिवरी हा एकमेव गाव आहेत. हीवरी येथील शिवप्रतिष्ठानतर्फे आयोजित या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ज्येष्ठ नागरिक सत्कार कार्यक्रमात अध्यक्ष सरपंच इंदिरा पिदुरकर व प्रमुख पाहुणे म्हणून शुभम पिंपळकर उपस्थीत होते. हिवरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदीप आस्वले, उपसरपंच अजय राठोड, शाळा समिती अध्यक्ष ईश्वर थेरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संतोष आस्वले यांनी तर आभार प्रदर्शन श्रीकांत भगत यांनी केले. 

Comments are closed.