पुरुषोत्तम नवघरे, वणी: शिवपुराण कथेसाठी आलेल्या भाविकांना ब्लँकेट, फराळ व दूध वाटप करण्यात येत आहे. वणीतील संकेत ज्वेलर्सचे संचालक दिलिप रेभे यांच्या तर्फे गेल्या 3 दिवसांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. रोज सुमारे 100 ब्लँकेट प्रमाणे गेल्या तीन दिवसात 300 पेक्षा अधिक ब्लँकेट वाटप करण्यात आले आहे. तर उपवासाच्या फराळाचा व दुधाचा रोज सुमारे 500 – 600 भाविक लाभ घेत आहेत. परसोडा येथील मंडपस्थळी व बाजीराव महाराज वृद्धाश्रम येथे हे दोन्ही उपक्रम राबविण्यात येत आहे.
परसोडा येथे सुरु असलेल्या शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात भाविक आले आहेत. यातील मोठ्या प्रमाणात भाविक मुक्कामी आहे. सध्या हिवाळा सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट सुरू आहे. परसोडा हा भाग गावाबाहेर असल्यामुळे मंडपात भाविकांना थंडीचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन संकेत ज्वेलर्सचे संचालक दिलिप रेभे यांच्या द्वारे रोज गरजू भाविकांना ब्लँकेटचे वाटप केले जात आहे.
कथे दरम्यान अनेक भाविकांचा उपवास असतो. ही बाब लक्षात घेऊन दिलिप यांनी भाविकांसाठी फराळी चिवड्याची व दुधाची व्यवस्था केली. रोज सुमारे 500-600 याचा लाभ घेत आहे. संकेत ज्वेलर्सच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
सेवा हाच धर्म – दिलिप रेभे
थंडीमुळे भाविकांना ब्लँकेटची गरज असल्याची माहिती मिळाली तर अनेकांचा उपवास असल्याचे कळले. सेवा हाच धर्म हे तत्व लक्षात घेऊन रोज हे उपक्रम सुरू आहे. कथा मंडप व बाजीराव वृद्धाश्रम येथे हे उपक्रम सुरू आहे.
– दिलिप रेभे, संकेत ज्वेलर्स, वणी
Comments are closed.