विवेक तोटेवार, वणी: आज रविवार वणीच्या टिळक चौकात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला माल्यार्पण करून राज्याभिषेक दिन युवासेनेद्वारे साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव युवा मंडळ व शिवचरण प्रतिष्ठान यांच्या सहकार्यातून हा उत्सव साजरा करण्यात आला.
6 जुन हा दिवस संपुर्ण महाराष्ट्रात “शिवराज्याभिषेक दिन” म्हणून मोठया आनंदाने साजरा केल्या जातो. वणीत युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याला पंचामृत चढवुन अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भव्य भगवा झेंडा फडकावुन शिवाजी महाराज शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी हितेश गोडे, राहुल झट्टे, योगेश आवारी, निखील तुराणकर, धनंजय खाडे, शुभम पावडे, गणेश आसुटकर, पवन मांडेकर, पवन बुर्हान, पवन पारशीवे, करण नागपुरे, विपुल कुकडे, नंदु मांढरे, विजय बोरकर, अमित गायकवाड, गौरव डोळके, आशिष चिडे, गुरुदेव चिडे, तूषार बलकी, स्वप्नील आवारी, आकाश धानोरकर, साहिल पारखी, गणेश निब्रड, सुबोध उमरे, सुरज आवारी, मंगेश डोंगे, निखील खामनकर, आकाश लडांगे, अक्षय मुरकुटे, दिनेश मुरस्कर, अमोल मडावी, ध्रुव येरणे उपस्थित होते.
हे देखील वाचा:
तेलंगणात रेती तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात