सुशील ओझा, झरी: निसर्गाचा लहरीपणामुळे कापूस, सोयाबीनसह अन्य पिकांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे झरी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
पावसाअभावी कापूस, सोयाबीन पिकांची वाढ खुंटली आहे. कापसाला लाग कमी असल्याने एकरी ५ ते ६ क्विंटलच्या वर कापूस निघणेसुद्धा कठीण झाले आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अत्यल्प उत्पन्न झाल्याने तालुक्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे.
तरी नाफेड व सीसीआयमार्फत कापूस व सोयाबीनची खरेदी शासनाने करून हमीभावाच्या दीडपट स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार सोयाबीन, कापूस, चना, तूर व इतर कृषिमालांचा भाव देण्यात यावा. कृषिपंपाला दिवसा वीजपुरवठा देण्यात यावा. बोंडअळी उर्वरित रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावी व संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अन्यथा, शिवसेना तीव्र आंदोलन करणार, असा इशारा दिला आहे. .
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत घुगुल, संतोष माहुरे, दुष्यंत उपरे, सतीश आदेवार, विनोद उप्परवार, संदीप विचू, गजानन मडावी, नामदेव भाहकर, पवन राऊत, फैजल शेख,विकास पवार, संतोष वासाड, युनूस शेख, गजानन वाहिले, दयाकर गेडाम, अतुल निखाडे, वासुदेव देठे, प्रवीण भोयर, किसन गावंडे, लक्ष्मण उलमाले, संतोष सासनवर, नाना सुगंधे, संजय बिजगुणवार, अशोक कुडमेथे, नीलेश परचाके, देविदास तुरणकर, बाबाराव टोंगेसह शिवसैनिक उपस्थित होते.