विठ्ठलवाडी, वासेकर लेआऊटमध्ये फडकला भगवा !
संजय देरकर यांच्या नेतृत्त्वात शेकडोंनी बांधले शिवबंधन
बहुगुणी डेस्क, वणी: सध्या शिवसेनेचा भगवा सप्ताह सुरु आहे. या निमित्त शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख संजय देरकर यांचे नेतृत्त्व स्वीकारत शेकडो कार्यर्त्याचा जनसंपर्क कार्यालयात शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश झाला. यात विठ्ठलवाडी, वासेकर ले आऊट व शहरातील इतर भागातील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तर झरी तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा संजय देरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विठ्ठलवाडी व वासेकर ले आऊटमध्ये भगवा
विठ्ठलवाडी येथील अभिषेक तामिलवार, संग्राम गेडाम, अश्विन कठोते, विशाल सरोदे, सूरज पडदेवार, पराग येसनसुरे, आशुतोष नागभीडकर, हेमंत गावंडे, मनोज वाकटी, शेख शाबीर शेख अब्बास, सूरज खैरे, प्रतीक गौरकार, सोनू तिराणकर, सागर गोलाईत, आकाश तामिलवार इत्यादी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर वासेकर लेआऊट मधील नरेश घुमे, नरेश पाते, आशिष बागडे, शिवा दुर्गे, नारायण तिरांणकर यांच्यासह विविध पक्षात कार्यरत असलेल्या पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशासाठी विनोद ढुमणे व अजिंक्य शेंडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संजय देरकर यांचे नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे आहे. त्यामुळे हातात भगवा घेतल्याची प्रतिक्रिया यावेळी पक्ष प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांनी दिली.
घरोघरी शिवसेनेचा भगवा फडकवणार – संजय देरकर
विधासभा प्रमुख या नात्याने सध्या विधानसभा क्षेत्रात पक्ष संघटन बळकट करण्यावर भर आहे. सध्या भगवा सप्ताहाच्या निमित्ताने या कामाला अधिक वेग आला आहे. सध्या घरोघरी शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा दौरा सुरु आहे. याला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तरुणाई व विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत येत आहे. याचे समाधान आहे.
– संजय देरकर, विधानसभा प्रमुख, शिवसेना
संजय देरकर हे झरी सारख्या दुर्गम भागात संघटन वाढीसाठी परिश्रम घेत आहे. त्याला परिसरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. असे मनोगत यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय देरकर यांच्या सोबत एकजुटीने राहण्याचे आवाहन गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद ढुमणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार दिपंकर वनकर यांनी मानले. कार्यक्रमाला संतोष भोंगळे, संजय देठे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
Comments are closed.