‘या’ गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश, आगामी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
नव्या जोशाने, नव्या उमेदीने शिवसैनिक सज्ज - आ. संजय देरकर
बहुगुणी डेस्क, वणी: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ने जबरदस्त मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आमदार संजय देरकर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील निलजई, तरोडा, बेलोरा या गावांतील शेकडो कार्यकर्त्यांनी विविध पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश घेतला. हा भव्य सोहळा आमदार देरकर यांच्या वणी येथील निवासस्थानी पार पडला, या पक्षप्रवेशाने शिवसेना (UBT) ला नवा जोश आणि बळ मिळाले असून, आगामी निवडणुकीत पक्षाला मोठी मजबुती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून वणी तालुक्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रश्नांवरून शिवसेना आक्रमक झाली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शिदोरी आंदोलन करून नुकसानभरपाईची मागणी लावून धरली, ज्यामुळे सामान्य जनतेसह विविध पक्षातील नेते-कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यातून आकर्षित होत आहेत. हे आंदोलन केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी झाले, ज्याचा परिणाम म्हणजे हा पक्षप्रवेशाचा महासंकल्प होय.
पक्षप्रवेश सोहळ्यात महेंद्र हरी राखुंडे, अनिकेत सुधाकर कुमरे, अमोल गुरुदेव तितरे, अमोल यमपल्लीवार, महेंद्र बावणे, पांडुरंग जेऊरकर, अमोल सोनटक्के, शकीस घिमे, युगल घिमे, सोपान कांबळे, सौरभ आसोटकर, सुरेश भटवलकर, यादव कांबळे, सुरज सातारकर, मोरेश्वर पाचभाई, संदीप ढोके, संतोष कोडापे, राहुल भोसर, दशरथ गंदनवार, नितीन भादिकर, दिलीप नवले, आशिष पाझारे, रोशन देहारकर, विठ्ठल जेऊरकर, संकेत भादिकर, आशिष सोनटक्के, विनय दहिया, प्रशांत भादीकर, प्राण टेकाम, संतोष जुमडे, निखिल हरडे, विनोद उईके, शुभम मोदाडे, परीक्षित सोनटक्के, सुरज निब्रड, सुभाष सोनटक्के,

कृष्णा झाडे, चंदू बर्डे, देविदास लोंढे, नितेश पाखके, शंकर कोटनाके, रोशन सोनटक्के, कुंदन कोडापे, जयभारत खोडे, भारत खोडे, सुरेश चिडे, रामू भोंगेवार, रमेश भादीकर, संदेश तितरे, विकास मुनगंटीवार, संजय जांभुळकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. हे प्रवेश करणारे विविध पक्षांतील सक्रिय नेते असल्याने हा सोहळा खरोखरच क्रांतिकारी ठरला!
नव्या जोशाने, नव्या उमेदीनं, शिवसैनिक सज्ज!
वणीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्ही सातत्याने लढत आहोत. आज आमच्या परिवारात सामील झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश ही केवळ संख्येची भर नाही, तर आमच्या विचारसरणीच्या बळकटीचा संदेश आहे. आगामी निवडणुकीत शिवसेना (UBT) नव्या जोशाने, नव्या उमेदीने शिवसैनिक मैदानात उतरेल आणि महायुतीला ठोस उत्तर देईल!
— आ. संजय देरकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख संजय निखाडे, उपजिल्हाप्रमुख शरद ठाकरे, सतीश वऱ्हाटे, दिवाकर भोंगळे यांच्यासह स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने हजेरी लावली. या सोहळ्याने शिवसेना (UBT) ची ताकद वाढली आहे.



Comments are closed.