विवेक तोटेवार, वणी: रमजान ईद असल्याने दुकानात मुस्लिम समाजातील अनेक जण खरेदीसाठी निघतात. दुकानात गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकत नाही. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे दुकान उघडण्यास परवानगी देऊ नये. अशा आषयाचे निवेदन 11 मे रोजी मुस्लिम समाजाने उपविभागीय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी व मुख्यमंत्री याना दिले आहे.
रमजान महिना हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र महिना समजल्या जातो. दरवर्षी मुस्लिम समाज रमजान ईद मोठया उत्सहात साजरी करतात. यावेळी ते कपडे, सुगंधी वस्तू, चप्पल इत्यादी वस्तूंची खरेदी मोठया प्रमाणात करतात. परंतु यावर्षी या पवित्र महिन्यात कोरोना महामारी आली तसेच यवतमाळ जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे.
आपला बचाव व कोणतीही अप्रिय घटना होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करीत आहे. अशा परिस्थितीत दुकाने उघडी असल्याने ईद साजरी करण्याकरिता अनेक जण खरेदीसाठी दुकानात गर्दी करू शकतात. ज्यामुळे कोरोना महामारी परसरण्याची दाट शक्यता आहे. शिवाय यावेळी सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडू शकतो. त्यामुळे रमजान ईद होतपर्यंत दुकान उघडण्याची परवानगी देऊ नये असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देते वेळी अ.रज्जाक पठान, नईम अजीज, शहीद खान, फारुख रंगरेज, इमरान खान, अनवर हयाती, इरफ़ान सैय्यद यासह समाजातील लोक उपस्थित होते.