निमनी शाळेच्या मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीस

शाळा सुरू होण्यापूर्वीची कोणतीही पूर्व तयारी नसल्याचे आले निदर्शनात

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील निमनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा भोंगळ कारभार गटशिक्षणाधिकारी यांच्या भेटी दरम्यान उघड झाला आहे. शासनाने सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन शाळा सुरू केली जाणार आहे. तर अनेक शाळा सुरू सुद्धा झाल्या आहे.

याच अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी प्रकाश नगराळे 28 जून रोजी शाळा तपासणी करीता तालुक्याचा दौरा केला. ते निमनी शाळेत पोहचले व त्यांनी तिथे तपासणी केली असता शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा सुरू होण्याची कोणतीही पूर्व तयारी नसल्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या गृहभेटी देखील घेतली नसल्याचे निदर्शनास आले.

शाळेत पटनोंदणी सर्वेक्षण रजिस्टर नव्हते. अधिकारी यांची भेट दिल्या दिवसापर्यंत एकही विद्यार्थी शाळेत दाखल केला नाही. शाळा पूर्व त्यारिकरिता मुख्याध्यापक यांनी शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेतली नाही. तसेच शाळेतील शौचालय अस्वच्छ होते व शौचालयात मोठे दगड टाकून असल्याचे आढळले.

याशिवाय शालेय अभिलेखाची तपासणी केली असता संपुर्ण शालेय अभिलेखे अपुर्ण होते. शाळेचे वार्षिक निकाल लिहीलेले नव्हते त्यामुळे विद्यार्थाना वर्गोन्नती कशी दिली त्याबाबत शंका व्यक्त केली आहे. शाळेत ऑनलाईन/ऑफलाईन नियोजन करण्यात आले नाही.

U-DISE 2021 नुसार ST प्रवर्गातील 52 विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अद्याप पाठवण्यात आलेले नाही. त्यामुळे 59 हजार रूपयांची रक्कम वेतनातून वसूल करून विद्यार्थाना शिष्यवृत्ती वितरीत का करू नये असे नोटीस देखील मुख्याध्यापकांना बजावण्यात आली आहे. तसेच शिस्तभंगाची कार्यवाही का करू नये असा देखील यात उल्लेख आहे. याचा खुलासा तीन दिवसात सादर करण्याची वेळ देण्यात आली आहे.

हे देखील वाचा:

बांधकाम विभागाचा महावितरणला 7 दिवसांचा अल्टिमेटम

Leave A Reply

Your email address will not be published.