अधिक मास निमित्त हनुमान मंदिरात भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी : यंदा श्रावण महिन्यात आलेल्या अधिक महिन्या निमित्त येथील यात्रा मैदान परिसरात हनुमान मंदिरात भागवत ज्ञानयज्ञ कथाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री भागवत ज्ञानयज्ञ समिती तर्फे आयोजित या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये श्री क्षेत्र कोंडोली, ता. मानोरा जिल्हा वाशिम येथील ह.भ. प. सुश्री राधाताई बबन महाराज देव कोंडोलिकर भागवत कथा वाचन करणार आहे. 

दिनांक 29 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत दुपारी 2 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आयोजित या सप्ताहात विविध प्रकारच्या झांकी व प्रसाद वितरण करण्यात येणार आहे. तसेच दिनांक 5 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजे पर्यंत हवन व नंतर महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे. वणी शहर व परिसरातील भाविकांनी श्री भागवत ज्ञानयज्ञ कथा श्रवण लाभ घेण्याचा आवाहन आयोजन समिती व ह.भ प. मुन्ना महाराज तुगनायत यांनी केले आहे.

भागवत कथा श्रवण केल्यास होतो पापांचा नाश

अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. योगायोग असा झाला आहे की, श्रावण महिन्यात अधिक महिना आला आहे. अधिक महिन्यात भागवत कथा श्रवण केल्यास अनेक पापांचा नाश होतो. अशी मान्यता आहे. 

Comments are closed.