श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा स्वातंत्र्यदिन साजरा

संस्थेच्या विविध शाखांमध्ये ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम

0

विवेक तोटेवार, वणी: स्थानिक श्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित विविध शाखांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त संस्थेच्यावतीने ध्वजारोहण आणि विविध कार्यक्रम झालेत. वणी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य बाबू थॉमस यांनी ध्वजारोहण केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ओम प्रकाश चचडा उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सदस्य विक्रांत चचडा होते.

अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सतीश पाटील आणि राजर्षी शाहू महाराज हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शुभांगी चोपणे यावेळी उपस्थित होत्या. अध्यक्षीय भाषणात ओमप्रकाश चचडा यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. कोरोनाच्या काळात कठीण परिस्थितीत आपण जात असून सर्वांनी स्वतःचे आरोग्य सांभाळावे. खंबीर होऊन या संकटाला लढा द्यावा. असे ओमप्रकाश चचडा यावेळी म्हणालेत.

कार्यक्रमाचे संचालन अभय पारखी यांनी केले. आभार ज्योती राजूरकर यांनी मानले. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम ऑनलाइन झालेत. व्हॉइस ऑफ मिहान. व्हॉईस ऑफ बिग एफएम नागपूर अश्विनी सोनटक्के यांचे गीतगायन झाले. विविध कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

हा कार्यक्रम फेसबुक लाईव्ह वरून ऑनलाईन झाला. कार्यक्रमाच्या यशासाठी संस्थेचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.