सिध्दार्थ समता विहारात बुध्दमुर्तीची प्रतिष्ठापना

विहार धम्मकेंद्र बनुन नवपिढी धम्मसंस्कारीत झाली पाहिजे - गणपत पेटकर

0

विलास नरांजे,वणी: लालगुडा(नवीन) येथे बौद्ध विहाराचे उद्घाटन करण्यात आले तसेच बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. शनिवारी दुपारी हा कार्यक्रम पार पडला. भन्ते महा तीस्सा यांच्या द्वारा बुध्दमूर्तीची प्रतिष्ठापना व विहाराचे उद्घाटन करण्यात आले. गणपतजी पेटकर, माजी ता.अध्यक्ष भा.बौ.म.स यांनी या विहाराला बुध्दमूर्ती दान केली आहे. बौध्दबांधवांनी अतिशय मेहनतीने सिध्दार्थ समता विहार ऊभे केले.

Podar School 2025

या प्रसंगी गणपत पेटकर म्हणाले की बुध्द विहार आणि मूर्ती स्थापन केल्याने धम्मकार्य संपत नाही. जेव्हा ख-या अर्थाने हे विहार धम्मकेंद्र बनुन नवपिढी धम्मसंस्कारीत बनविण्याचे मौलिक कार्य घडेल. तेव्हाच मेहनतीचे चीज झाले असे म्हणता येईल. बुध्दाने सांगितलेला सदाचाराचा,नितिमत्तेचा मार्ग आचरणात आणून सर्वांनी आपले जीवन उज्वल करावे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या क्षणी भगवानजी इंगळे यांनी सुध्दा आपले विचार मांडले. नंतर भिख्खुसंघाद्वारा धम्मदेसना करण्यात आली. कार्यक्रमाला गावातील आजुबाजुच्या परीसरातील बांधवांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाच्या प्रथम सत्राचे सुत्रसंचलन नागसेन साठे तर किशोर तामगाडगे यांनी आभार मानले.

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )

Leave A Reply

Your email address will not be published.