गौराळ्याजवळ ऑटोला अपघात, एक ठार, तर दोन जखमी

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: वणी वरुन प्रवासी घेऊन मारेगाव कडे येणाऱ्या ऑटोला गौराळा जवळ अपघात झाला. अॅटोचे संतुलन बिघडल्याने आॅटो पलटुन झालेल्या या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाले. शनिवारी 5 वाजताच्या सुमारास ही घटना पाच घडली.

प्राप्त माहिती नुसार वणी येथून अॅटो चालक गणेश सुभाष सोमलकर रा.हिवरी अॅटो क्र. एम.एच.२९,व्ही.८६१९ हा प्रवासी घेऊन मारेगाव कडे येत असताना तालुक्यातील गौराळा जवळ एका ट्रकने अॅटोला कट मारली. त्यात अॅटोचे संतुलन बिघडले. त्यामुळे अॅटो स्लिप होऊन पलटी झाला. यात अॅटोतील प्रवासी सुनिल खेवले (३२) रा.मांगरुळ याचा उपचाराने दरम्यान मृत्यू झाला, तर अॅटोतील संजय वराटे वय ३०, सारिका वराटे वय २८ हे दोघेही रा.करणवाडी जखमी झाले आहे.

जखमींवर मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरू आहे. अपघातात दरम्यान संजय वराटे यांचा मुलगा नयन वराटे सुखरुप  आहे. घटनेचा तपास मारेगाव पोलीस करित आहे

(आपल्या जवळ असणा-या न्यूज किंवा पब्लिश झालेल्या न्यूज संबंधी संपर्क साधू शकता, निकेश जिलठे- संपादक, वणी बहुगुणी 9096133400 )

Leave A Reply

Your email address will not be published.