मोफत विजेबाबत स्वाक्षरी अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद
रविवारी नांदेपेरा सर्कलमध्ये स्वाक्षरी अभियानांतर्गत दौरा
विवेक तोटेवार, वणी: वाढलेले वीजेचे दर कमी करण्यासाठी व 200 युनिट वीज मोफत देण्याच्या मागणीसाठी संजय देरकर यांनी रणशिंग फुंकले आहे. 9 ऑगस्टला क्रांतीदिनाचे औचित्य साधून स्वाक्षरी अभियानाचा आरंभ झाला. रविवारी संजय देरकर यांनी नांदेपेरा दौरा केला. परिसरातील गावातील लोकांनी या अभियानात उत्स्फुर्त सहभाग घेतला.
रविवारी रांगणा, भुरकी, वडगांव, झोला, सार्वला, कोना, नायगाव, निळापूर, ब्राम्हिणी इत्यादी गावांमध्ये स्वाक्षरी अभियानांतर्गत संजय देरकर व कार्यकर्त्यांनी भेट दिली. यावेळी गावात गृहभेटी घेऊन गावक-यांना स्वाक्षरी अभियानाबाबत माहिती देऊन या अभियानाविषयी माहिती देण्यात आली. गावक-यांनी निवेदनाच्या फॉर्मवर स्वाक्षरी करून या अभियानात सहभाग घेतला.
यावेळी जगन जुनगरी, दिलीप परचाके सरपंच रांगणा, संतोष आसुटकर, संतोष कुचनकर, बालू बोढे ,उत्तम डाकरे, प्रवीण कडुकर, खामनकर काका, नागेश, काकडे, संजू देठे, भगवान मोहिते, लतीफ खान, इत्यादी यांच्यासह संजय देरकर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. मोफत वीज व वीजदराबाबत 1 लाख 11 हजार स्वाक्षरी गोळा करून या स्वाक्षरीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले जाणार आहे. या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावी असे आवाहन शेतकरी विद्युत परिषदेतर्फे करण्यात आले आहे.