डॉ. श्याम जाधव (नाईक) यांची माहुली गावाला भेट

कावड यात्रेसाठी भाविकांना दिल्या शुभेच्छा

0 189

मानोरा: सोमवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी सेवालाल महाराज कावड समितीच्या कावड यात्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे व्हीजेएनटी सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी माहुली येथे भेट दिली. आज श्रावण सोमवारच्या मुहुर्तावर या कावड यात्रेला प्रारंभ झाला. न्यू सेवालाल कावड मित्र मंडळ माहुली तर्फे ही कावड यात्रा आयोजित करण्यात आली. या मंडळाचे हे तिसरे वर्ष आहे. श्रावण महिन्याच्या दुस-या सोमवारी माहुली ते बंजारा काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी अशी कावड यात्रा काढली जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून या यात्रेची परंपरा आहे. यात भाविक कावड घेऊन पोहरादेवी पर्यंत पदयात्रा करतात. आज या कावड यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी माहुली गावात डॉ. श्याम जाधव (नाईक) यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भाविकांची भेट घेत त्यांना कावड यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. या कावड यात्रेत बंजारा समाजातील शेकडो भाविक सहभागी असतात.

यावेळी माहुली गावाजे सरपंच राम राठोड, माजी सरपंच जयसिंग जाधव, हिरामण राठोड (माजी पीएसआय) माजी सैनिक प्रकाश राठोड, दयाराम महाराज, रणजीत राठोड, कैलास चव्हाण, संदीप जाधव, राजेश राठोड, अविनाश राठोड, सत्यपाल राठोड, निखिल चव्हाण, देवानंद आडे, योगेश दोन्तकर, नीलेश चव्हाण, अक्षय जाधव, सुरेश जाधव, जयपाल राठोड, अनिल आडे, मनोज सावंत, सचिन सावंत, सदानंद काळे यांच्यासह विजय नाईक, संजय जाधव, युवराज जाधव, गोपाळ राठोड, प्रकाश राठोड, रामेश्वर राठोड व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Loading...