सिंगल यूज प्लास्टिकच्या वस्तू जानेवारीपासून बंद होणार

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केली अधिसूचना

0

जब्बार चीनी, वणी: सिंगल युज प्लास्टिकपासून तयार झालेल्या सर्व वस्तूंची निर्मिती आणि विक्रीला 1 जानेवारी 2022 पासून प्रतिबंध केला जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं अधिसूचना प्रसिध्द केली आहे. त्यावर 60 दिवसांत म्हणजे 11 जूनपर्यंत आक्षेप मागविले आहेत. त्यानुसार उत्पादकांसह नागरिकांनाही त्यांच्या सूचना मांडता योणार आहेत.

प्लास्टिक गैरवापराला निबंध आणि व्यवस्थापक अधिनियम 2016 मधील काही तरतुदीमध्ये सुधारणा करण्यासाठी 11 मार्च 2021 रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामध्ये सिंगल युज प्लास्टिक तसेच इतरही उत्पादनामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले. अधिनियमातील तरतुदीमध्ये बदल केला जाणार आहे.

काय आहे नवीन अधिसूचनेत?
आधी 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग, शिट गुटखा पाऊच, तंबाखू आणि पान मसाला पॅकिंगवर बंदी होती. त्याची अंमलबजावणी काही राज्यांमध्ये चांगल्या पध्दतीने झाली तर काही ठिकाणी दुर्लक्ष करण्यात आले. आता त्या नियमांमध्ये सुधारणा केली जात आहे. त्यामध्ये आता 50 ऐवजी 120 मायक्रॉन जाडीची अट टाकण्यात आली आहे. तसेच प्लास्टिक कॅरिबॅगची जाडी 240 मायक्रॉनपेक्षा कमी राहणार नाही. यासाठीही प्रतिबंध लावण्यात येणार आहेत.

100 मायक्रॉनची राहणार मयादा सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये प्लेट, कप, ग्लास, काटे, चमचा, चाकू, स्टॉ, मिठाईचे डबे, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पॅकेटसाठी वापरल्या जाणा-या प्लास्टिकची जाडी 100 मायक्रॉनपेक्षा कमी राहणार नाही, असाही नियम केला जात आहे. या नियमानुसार नसलेल्या सिंगल युज प्लास्टिकच्या वस्तूंवर 1 जानेवारी 2022 पासून प्रतिबंध केला जाणार आहे.

हे देखील वाचा:

अत्यावश्यक सेवेत नसणा-या एकल दुकानांना परवानगी

कोरोनातही जुगार जोमात, शिरपूर व गोपालपूर येथे छापा

Leave A Reply

Your email address will not be published.