मॅजिक पेनने पासमध्ये खोडतोड करून रेतीची तस्करी

मनसेचे राजू उंबरकर यांनी पकडला ट्रक

0

जितेंद्र कोठारी, वणी: मॅजिक पेनच्या सहाय्याने वाहतूक पास (रॉयल्टी) मध्ये खोडतोड करुन रेतीचे वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकला मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी पकडले. वणी येथील शेतकरी मंदिर भवन जवळ ही कार्यवाही करण्यात आली. ट्रक पकडल्यानंतर महसूल अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले व पुढील कारवाईसाठी ट्रक त्यांच्या ताब्यात देण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर गुरुवारी दुपारी आपल्या कार्यालयातून घराकडे निघाले असता शेतकरी मंदिर रस्त्यावर रेती भरलेला हायवा ट्रक (MH34 BG 3810) उभा दिसला. उंबरकर यांनी ट्रक चालक जवळ असलेली रॉयल्टी चेक करण्यासाठी ट्रकच्या सायलेन्सरवर ठेवली. मात्र गरम सायलेन्सरवर ठेवताच रॉयल्टीवर मॅजिक पेनच्या मदतीने खोडतोड करून लिहिलेले अक्षर गायब झाले.

रेतीची अवैध वाहतुकीच्या संशयावरून उंबरकर यांनी तहसीलदार विवेक पांडे यांना माहिती दिली. सूचनेवरून नायब तहसीलदार कापसीकर यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत हायवा जप्त केला. जप्त करण्यात आलेला ट्रक तहसील कार्यालयात नेऊन उभा करण्यात आला आहे. पकडण्यात आलेला ट्रक वरोरा येथील रेती व्यावसायिक तानाजी घुगरे यांचा असून वरोरा तालुक्यातील करंजी घाटातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची महिती आहे. सदर ट्रकमध्ये 6 ब्रास रेती असल्याची माहिती असून या प्रकरणी जमीन महसूल अधिनियम अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात येईल. असे नायब तहसीलदार कापसीकर यांनी सांगितले.

हे देखील वाचा:

वणी शहरात 5 नंतर अवैध धंद्यांना ऊत

कोरोना योद्धा शिक्षकच पॉजिटिव्ह, शिक्षकांमध्ये संताप

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.