बँड, डीजे व मिरवणुकीच्या खर्चात राबवला सामाजिक उपक्रम
जय बजरंग गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील जय बजरंग गणेश मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात सार्वजनिक गणेश मंडळावर अनेक निर्बंध आणली गेली. डीजे, ढोल ताशे याला सुद्धा बंदी घालण्यात आली. शिवाय अडीच ते तीन फुटाच्यावर मूर्ती बसवू नये असे देखील आदेश देण्यात आले होते. त्यामुळे यावर्षी सांस्कृतिक उपक्रमांना कात्री लागली होती. मात्र जय बजरंग गणेश मंडळाने यावर्षी रक्तदान शिबिर आयोजित करून एक आदर्श निर्माण केला असेच म्हणावे लागेल.
गेल्या १९ वर्षांपासून गणपती स्थापना करीत आहे. जय बजरंग गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रशांत येरावार व सदस्य यांनी मच्छीमार सोसायटीत रक्तदान शिबिराचे आयोजन केले. याकरिता यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय यांच्या चमुला पाचारण करण्यात आले.
डॉ प्रदिप वाघमारे, डॉ. मोबीन दुंगे (समसेवा अधिक्षक), मोहन तळवेकर (अधिपरिचारक), विठ्ठल डोळस, डॉ दत्ता चौरे (रक्त संक्रमण अधिकारी), आचल चौधरी, श्रेया वाहुळे, शिवानी मेंढे, महेश मिश्रा आले तर मुकुटबन येथील आरोग्य विभागाचे डॉ विपुल देवतळे, डॉ संजय सूर्यवंशी, व्यंकटेश मेडपेल्लीवार, राजन्ना बच्चलकुरा, गणपत इंगलो,आशा वर्कर शोभा गडेवार उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त दान शिबिराला सरपंच शंकर लाकडे, पत्रकार सुशील ओझा, रक्तदान फाउंडेशनचे प्रियल पथाडे, प्रफुल भोयर, तसेच भालचंद्र बरशेट्टीवार, राजू वनकर,अतुल विधाते,हेमंत गेडाम,प्रशांत रासमवर ,गणेश येरावार, कैलास पारशिवे व नवणुतन गणेश मंडळ,जय बजरंग गणेश मंडळाचे पदाधिकारी व मच्छिमार सोसायटीचे विशेष सहकार्य लागले.