स्वयंसेवी संस्था महासंघाची कार्यकारिणी जाहीर

वसंत जिनिंग येथील सभागृहात नियुक्ती पत्र वितरीत

0

जब्बार चीनी, वणी: वणी येथे भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ (भारत) या संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रविवारी शहरातील वसंत जिनिंग येथे यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय कांबळे व राज्य समन्वय कर्मा तेलंग यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ ही विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्थेची संघटना आहे.

दिनांक 30 ऑगस्ट रोजी वसंत जिनिंग सभागृहात पार पडलेल्या बैठकीत वणीची तालुका व वणी शहर कार्यकारणी गठीत करण्यात आली. यात तालुका अध्यक्ष पदी ऍड, कु. स्नेहल पाटील, तालुका संघटक प्रा. रोहित वनकर, महिला संघटक माया लोहबडे, तालुका प्रमुख वृषाली खानझोडे यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिका-यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र वितरित करण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख व संघटक डाँ विष्णू उकुंडे, समन्वयक कार्याध्यक्ष जुनेद काजी, प्रभारी जिल्हा अध्यक्ष नासिर, कार्याध्यक्ष गौरव इंगळे, इरफान शेख, संदीप आसुटकर यांच्यासह वणी मारेगाव झरी तालुक्यातील संस्था प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था इ. संस्थांची संघटना म्हणून भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ काम करते.

Leave A Reply

Your email address will not be published.