मार्कीच्या डॉक्टर मुलीचे ब्रह्मपुरी येथे उत्कृष्ट समाजकार्य

पूरग्रस्त पीडितांना औषधोपचार व स्वखर्चाने केली जेवणाची व्यवस्था

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मार्की येथील शेतकरी देवनाथ भोंगळे यांची कन्या डॉ. जयश्री. ती ब्रह्मपुरी जिल्ह्यातील अहेर- नावरगाव येथील शासकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. हिने पुढाकार घेऊन उपचारांसोबतच पूरग्रस्त जनतेला जेवणाची व्यवस्था करण्याच्या ध्यास घेतला. स्वखर्चाने सर्वांना अन्नदान केले. सर्वांच्या पोटाची भूक मिटविली. आरोग्यविभागात असेही मानवतावादी लोक असून अशा समाज कार्यात पुढे येतात.

Podar School 2025

२८ ऑगस्ट २०२० रोजी मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण फुल्ल भरयन वाहू लागले. पाण्याची पातळी धोक्याबाहेर जात असल्याने धरणाचे ३३ दरवाजे ५ मीटरने उघडण्यात आलेत. त्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला. किनाऱ्याजवळील लाडज, अहेर, नवरगाव व पिंपळगाव व इतर गावांतील अनेक घरे पुरात वाहून गेलीत. गुरेढोरेसुद्धा वाहून गेलेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

शेकडो घरांचे नुकसान झाले. छपरे उडालीत. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. तर अनेक कुटुंब बेघर झालीत. उघड्यावर पडलेल्या जनतेकरिता औषध उपचार करण्याकरिता अहेर नवरगाव येथील आरोग्य विभागाची चमू आली. बेघर उपाशी असलेल्या लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत व्यक्तीच्या पोटाची भूक पाहून डॉक्टर जयश्री भोंगळे हिचे हृदय द्रवले.

बेघर पूरग्रस्त व उपाशी पोटाला आधार देणारी तसेच सामाजिक बांधीलकी जोपासणारी डॉ जयश्री भोंगळे हीचे परभणी जिल्ह्यात नाव झाले. आदिवादीबहुल तालुक्यातील मार्की गावाचे नावसुद्धा लौकिक केले. डॉ. कु. जयश्री हिच्या कार्याचे सर्व स्तरांवरून कौतुक होत आहे.

(वणी मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

Leave A Reply

Your email address will not be published.