शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत वणीच्या विद्यार्थिनींचा झंझावात
एसपीएम विद्यालयाची अंडर-17 व्हॉलीबॉल चमू विभागीय स्पर्धेत विजयी
पुरुषोत्तम नवघरे, वणी: येथील शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची अंडर-17 मुलींची व्हॉलीबॉल चमू दिनांक 3 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे पार पडलेल्या शालेय विभागीय क्रीडा स्पर्धेत विजेतेपद पटकावून घवघवीत यश संपादन केले.
या उल्लेखनीय कामगिरीमुळे विद्यार्थिनींचे सर्वत्र कौतुक होत आहे. विजयी संघात प्रणाली कामटकर, भाग्यश्री कामटकर, आरुषी मोगरे, माधवी आसुटकर, धानी मजगवळी, बसरत जहा अहमद, जानवी तरासे, साक्षी शेंडे, श्रावणी आणि मयुरी मानकर यांचा समावेश होता.
या यशामागे विद्यालयाच्या शारीरिक शिक्षिका सिंग मॅडम, मालगडे सर आणि संस्कार क्लबचे कोच पिंपळकर यांचे नियमित मार्गदर्शन व परिश्रमपूर्वक सरावाचे मोलाचे योगदान आहे.
संस्थेचे अध्यक्ष विजय मुकेवार, उपाध्यक्ष नरेंद्रची बरडिया, सचिव सुभाषराव देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के, व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि प्राचार्य प्रमोद शिरसागर यांनी विजयी संघाचे अभिनंदन करत त्यांच्या यशाचे कौतुक केले.



Comments are closed.