स्पोकन इंग्लिश शिबिराच्या प्रवेशाची आज शेवटची तारीख

1 मे पासून 5 ठिकाणी स्पोकन इंग्लिशचे विशेष उन्हाळी शिबिर

पुरुषोत्तम नवघरे, वणीः बुधवारी दिनांक 1 मे पासून स्पोकन इंग्लिश शिबिराला सुरुवात होत आहे. शिबिराची ऍडमिशन प्रक्रिया जवळपास संपली असून आता अवघ्या 10 जागा शिल्लक आहे. त्यामुळे आजच्या आज ऍडमिशन करणा-या विद्यार्थ्यांना बुधवारपासून सुरु होणा-या शिबिरात सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी  7038204209 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रा. सागर जाधव यांनी केले आहे.

आता इंग्रजीची भीती बाळगण्याचं कारण नाही. ती जागतिक व्यवहाराची भाषा आहे. तिला आपण सहज आत्मसात करू शकता. तेही अगदी 15 दिवसांत. आजच्या काळात इंग्रजी अनेकांना चांगलं वाचता आणि लिहिता येतं. तरीदेखील इंग्रजीतून संवाद साधणं अनेकांना जमत नाही. त्याचा तसा अनेकांना सराव नसतो किंवा तसं वातावरण मिळत नाही. त्यातही नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थ्यांना वेळ मिळत नाही. म्हणूनच स्पोकन इंग्लिश म्हणजे इंग्रजी संभाषणाचे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरात प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. सर्व विद्याथी, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे, गृहिणी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी हे शिबिर अत्यंत सोयीचे आहे. हे शिबिर शहरातील नांदेपेरा मार्गावरील न.प. शाळा क्र. 5, गुरुनगर हनुमान मंदिराजवळील जोगी यांच्या घरासमोर, छोरिया लेआऊटमधील हनुमान मंदिराजवळील शाळेत, आनंदनगर येथील ताजने यांच्या घराजवळ, टागोर चौकात पुतळ्यासमोरील केव्हीसी हाईट बिल्डिंग येथे होईल.

या शिबिरात बेसिक इंग्लिश म्हणजे पायाभूत इंग्रजीवर भर देण्यात येईल. इंग्रजी बोलण्याच्या छोट्या छोट्या युक्त्या शिकवण्यात येतील. विद्यार्थ्यांकडून बोलण्याचा सराव करून घेण्यात येईल. या शिबिरादरम्यान प्रत्येक शिबिरार्थ्याला प्रिंटेड नोटस् देण्यात येतील. सोबतच प्रत्येक शिबिरार्थ्याला रोजच्या प्रशिक्षणाच्या ऑडिओ क्लिप्स स्मार्टफोनवर पाठवण्यात येतील. शिबिरार्थी 7038204209 या मोबाईल नंबरवरदेखील नोंदणी करू शकतात.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बेसीक इंग्लीश म्हणजेच पायाभूत इंग्रजीवर भर दिला जाईल. व्यक्तिमत्व विकासाचं नवं तंत्र या शिबिरातून विद्यार्थ्यांना मिळेल. नेतृत्वगुणांचा विकास व्हावा म्हणून तज्ज्ञ सराव आणि प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करतील. आरोग्यम् धनसंपदा या सत्रात आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे तज्ज्ञ सांगतील. वक्तृत्वकला तथा संभाषण कौशल्य, वाचनकौशल्य यावर त्या त्या क्षेत्रांतील एक्सपर्ट्स प्रशिक्षण देतील.

शिबिरार्थ्यांना हसतखेळत हे प्रशिक्षण पूर्ण करता यावं म्हणून जोडीला अनेक उपक्रम राहतील. यात शिबिरार्थ्यांसाठी सहल होईल. संपूर्ण शिबिरार्थ्यांसह सिनेमा पाहिला जाईल. स्विमिंग आणि अन्य इनडोअर आऊटडोअर गेम्स होतील. प्रतिभावंताच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य, अभिनय आदी कलाप्रकारांचं सादरीरकण होईल. अधिक माहितीसाठी एस. पी. शाळेजवळील वॉटर सप्लाय कार्यालयात प्रा. सागर जाधव यांच्याकडे सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत करता येईल. अधिक माहितीसाठी आपण 7038204209 या नंबरवर संपर्क साधू शकता.

Comments are closed.