SSC निकाल- कु. जान्हवी संजय पांडे तालुक्यातून प्रथम तर कु. हिमानी नीलेश चचडा तालुक्यातून द्वितीय
जितेंद्र कोठारी, वणी : राज्य बोर्डाचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) दहावीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. दरवर्षी प्रमाणे यंदाही वणीत निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे. वणीतून लॉयन्स इंग्लिश मीडियम हायस्कूलची कु. जान्हवी संजय पांडे ही 95.60 टक्के गुण घेऊन तालुक्यात प्रथम आली आहे. वणी पब्लिक स्कूलची कु. हिमानी नीलेश चचडा ही 95.40 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम व तालुक्यातून द्वितीय आली आहे. लॉयन्स शाळेतील कु. निधी श्रीनिवास येनगंटीवार व जनता शाळेतील कु. हर्षा विनोद ठमके 95.20 समान गुण घेऊन तालुक्यातून तृतीय आले आहे. तर एसपीएम शाळेची कु. प्राची विवेक देठे ही विद्यार्थिनी 94.80 टक्के गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम आली आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. संपूर्ण तालुक्यात पहिल्या पाचमध्ये मुलीचाच समावेश आहे.
लॉयन्स शाळेतून कु. जान्हवी संजय पांडे ही 95.60 टक्के गुण घेऊन शाळेतून व तालुक्यातून प्रथम आली आहे. तर कु. निधी श्रीनिवास येनगंटीवार ही 95.20 टक्के गुण घेऊन शाळेतून दुसरी आली आहे. कु. परिनिता चंद्रकांत ठाकरे ही 94.80 टक्के गुण घेऊन शाळेतून तिसरी तर कु. सिद्धी सतिश चहारे ही 94.60 टक्के गुण घेऊन शाळेतून चौथी आली आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ (एसपीएम) शाळेतून कु. प्राची प्राची विवेक देठे ही विद्यार्थीनी 94.80 टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे. कु. कौमुदी धनंजय सरमोकदम ही 93.40 टक्के गुण घेऊन शाळेतून दुसरी तर ओंकार अमर देवाळकर हा 92.40 टक्के गुण घेऊन शाळेतून तिस-या क्रमांकावर आला आहे.
जनता विद्यालयातील कु. हर्षा विनोद ठमके ही विद्यार्थीनी 95.20 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम व तालुक्यातून तृतिय आली आहे. सुमेध सुनील झाडे हा 92.20 टक्के गुण घेऊन शाळेतून द्वितीय तर कु. राधा अमोल आस्वले ही 90.40 टक्के गुण घेऊन शाळेतून तृतिय आली आहे.
वणी पब्लिक स्कूलची कु. हिमानी नीलेश चचडा ही विद्यार्थीनी 95.40 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम व तालुक्यातून द्वितीय आली आहे. कु. श्रावणी अनिल मस्के ही 93.20 टक्के गुण घेऊन शाळेतून द्वितीय तर कु. कल्याणी प्रमोद ठाकरे व भूषण अश्विन नगरकर हे समान गुण म्हणजे 91.80 टक्के गुण घेऊन शाळेतून तृतिय आले आहेत.
विवेकानंद विद्यालयातून प्रियदर्शन राजू भोंग हा 90% गुण घेऊन शाळेतून प्रथम, कु. सानिका विठ्ठल निमकर ही 89.80% गुण घेऊन शाळेतून द्वितीय तर कु. श्वेता विजय लखमापुरे 86.80% गुण घेऊन शाळेतून तिसरी आली आहे.
यावर्षी वणी तालुक्याचा निकाल 89.97 टक्के लागला आहे. वणी विभागातून वणी पब्लिक स्कूल, संताजी इंग्लिश मीडियम स्कूल, भास्कर ताजणे विद्यालय, कळमणा, राजश्री शाहू महाराज विद्यालय वणी या शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे.
Comments are closed.