दहावीत मारेगाव तालुक्यात 95 टक्के विद्यार्थी यशस्वी

स्वरांगी गायकवाड प्रथम तर मानसी काळे द्वितीय

भास्कर राऊत, मारेगाव : माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. यात मारेगाव तालुक्याचा सरासरी निकाल 95.33 टक्का लागला आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारीत वाढ झालेली आहे. तालुक्यात प्रथम येण्याचा मान पुन्हा मुलींनीच मिळवला आहे. विद्यानिकेतनची स्वरांगी सुनील गायकवाड 94.60% गुण घेऊन तालुक्यातून प्रथम आली तर मानसी गुणवंत काळे ही 94% गुण घेऊन द्वितीय आलेली आहे. प्रणव प्रवीण लोंढे 92.60% गुण घेऊन तृतीय आला आहे.

मारेगाव तालुक्यात दहावीच्या परीक्षेत एकूण 922 विद्यार्थी बसले होते. त्यातील 879 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील बालाजीपंत चोपने माध्य. विद्यालय बोटोनी, कै. दामोदरपंत कन्या विद्यालय मारेगाव, श्री. जगन्नाथ महाराज हायस्कूल वेगाव, दर्शनभारती विद्यालय गोंडबुरांडा, महात्मा ज्योतीराव फुले विद्यालय मारेगाव, नेताजी सुभाषचंद्र बोस माध्य. विद्यालय म्हैसदोडका, कै. गिरजाबाई विद्यालय पिसगांव, विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल मारेगाव या शाळांचा निकाल 100% लागला आहे.

Comments are closed.