रंगनाथचे मतदार, ‘कपबशीत’ चहा पिणार

'परिवर्तन' फक्त संस्थेच्या हिताकरिता

बहुगुणी डेस्क : येथील श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या 17 संचालकासाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनल व जय सहकार पॅनल आमने सामने आहे. संस्थेचे विद्यमान अध्यक्षाची संस्थेवर आपला एकाधिकार कायम ठेवण्याची धडपड सुरु आहे. तर दुसरीकडे धुरंधर राजकारणी माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘परिवर्तन पॅनल’ एकाधिकार मोडून व संस्थेच्या हिताकरिता परिवर्तन करण्याच्या मूड मध्ये आहे.

परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांमध्ये सर्व साधारण गटातून जय नेमीचंद आबड, दिनकर कृष्णाजी आकनुरवार, वसंत श्रीरंग आसुटकर, शिरीष सूर्यकांत बोगावार, ऍड. भास्कर नानाजी ढवस, डॉ. राजेंद्र अजाबराव ढवस, प्रा. शाम माधव डोये, डॉ. भाऊराव भानुदास कावडे, राम वसंतराव खांडरे, डॉ. हेमंत वासुदेव खापने, डॉ. मोरेश्वर रामचंद्र पावडे, शेख इजहार शेख ग्यासुद्दीन निवडणूक लढत आहे.

महिला राखीव गटातून सौ.आरती संजय चौधरी व सौ. नम्रता मेघशाम तांबेकर, इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघातून तरुण तडपदार आशिष आनंद खुलसंगे, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार गटातून प्रा. डॉ. अविनाश नामदेव घरडे आणि भ.वि. जा.ज. विशेष प्रवर्ग राखीव मतदार संघातून राजेंद्र पुंडलिक कोरडे संचालक होण्यास पात्र आहे. त्यामुळे रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या हिताकरिता ‘परिवर्तन पॅनल’ च्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन ऍड. भास्कर ढवस आणि डॉ. मोरेश्वर पावडे यांनी केला आहे.

Comments are closed.