वणी एसटी डेपोतील संपकरी कर्मचाऱ्याला मारहाण

कर्मचारी संघटनेच्या सचिवासह दोघांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: संपावर असलेल्या एसटी महामंडळ कर्मचाऱ्याला कामावर का येत नाही, म्हणून एस.टी.कामगार संघटनेचे सचिव व एकाने जबर मारहाण केली. रविवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास वणी बस स्थानक परिसरात ही घटना घडली. एसटी कर्मचार्‍यानी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी दोन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.  

फिर्यादी दिलीप हुसेन आत्राम (53) रा कनकवाडी वणी हे एसटी महामंडळ येथे चालक पदावर कार्यरत आहेत. गेल्या चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्याचा विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी हे संपावर आहेत. सुरवातीला दिलीप संघटनेचे सदस्य होते. परंतु त्यांनी आता संघटना सोडली आहे.  रविवार दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास दिलीप वणी बस स्थानकाच्या चौकशी विभागापुढे उभे होते. त्यावेळी कर्मचारी संघटनेचे सचिव अंकुश दिगांबर पाते (40) रा. वणी  व सदस्य महादेव मडावी (56) हे त्याच्याजवळ आले व ड्युटीवर का येत नाही म्हणून शिवीगाळ केली. दिलीप आत्राम यांनी विरोध करताच दोघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

मारहाणीच्या घटनेनंतर पीडित एसटी कर्मचारी दिलीप हुसेन आत्राम उपोषणाला बसलेल्या एसटी कर्मचार्‍यांना सोबत घेऊन तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहचला. फिर्यादीच्या तक्रारीवरुन वणी पोलिसांनी मारहाण करणार्‍या दोघांविरुद्द कलम 323, 504 व 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे

Comments are closed.