भरधाव कारच्या धडकेत लाईनमन गंभीर जखमी

खडकी स्टॉपजवळील घटना, कर्तव्यावर असताना अपघात

0

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील खडकी (बु) येथील फाट्याजवळ दुचाकीला समोरून येणाऱ्या कारने जबर धडक दिली. या अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. चपंत टेकाम (45) असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते विद्युत कार्यालय मारेगाव अंतर्गत खडकी सबस्टेशन येथे लाईनमन या पदावर कार्यरत आहे.

चंपत टेकाम हे मारेगाव येथील रहिवाशी आहेत. सकाळी ते कर्तव्यावर होते. दुपारी 11 च्या सुमारास ते खडकी स्टॉपवर ते दुचाकी (MH29 BG-2612) बाजुला लावून पोलची पाहणी करत होते. दरम्यान वणी वरून परतवाड्याकडे एक डस्टर कार (MH27 AR-6405) जात होती. या कारने चंपत यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले.

जखमीला तात्काळ ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी वणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. वृत्त लिहे पर्यत घटनेची नोंद मारेगाव पोलीस स्टेशनला झाली नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.