मांडवी येथे ऑनलाईन मटका सुरू, रोज लाखोंची उलाढाल

गुगल पे व फोन पेने होतात आर्थिक व्यवहार

0

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या तसेच तालुक्याच्या शेवटच्या टोक व राज्याच्या बॉर्डरवर असलेल्या मांडवी गावात सध्या ऑनलाइन मटका चांगलाच फोफावला आहे. यातून रोजची लाखोंची उलाढाल होत आहे.

कोरोनामुळे संचारबंदी लागली होती. त्यामुळे मटका व्यवसाय बंद झाला होता. मात्र मांडवी येथील अक्षय व दिलीप नामक व्यक्तींनी यावर उपाय म्हणून ऑनलाईन मटका सुरू केला. मे महिन्यापासून मांडवीत हा अवैध व्यवसाय सुरू आहे. यात मोबाईल वरून मटक्याचे आकडे घेतले जाते व आकड्यावर लावलेले पैसे गुगल पे व फोन पे वरून घेतले जाते. यात हजारापासून ते 1 लाख रुपयांचा आकडे लावणारे ग्राहक असल्याची माहिती आहे. तर यातून होणारी महिन्याची उलाढाल ही 15 ते 18 लाखांपर्यंत असल्याची माहिती आहे.

ऑनलाईन मटक्यात तेलंगणातील ग्राहक
ऑनलाईन मटका चालक यांच्यावर पोलिसांचा छापा पडू नये किंवा मटका धंद्याची उघडकीस न येण्यासाठी महाराष्ट्रातील व आदिलाबाद येथील मटका खेळणाऱ्या व्यक्तींना संधी न देता आसिफाबाद निर्मल, जगीत्यार व निजमाबाद जिल्ह्यासह कड्यम, गुण्याला, उटनूर, जयनूर, आसीफाबाद येथील ग्राहकांकडून आकडे घेतले जातात.

ऑनलाईन मटका जुगारात राजधानी, कल्याण, टाइम बाजार, श्रीदेवी नाईट, मिलन नावाचे खेळ असून या खेळाचे निकाल दर एका तासाला निघतात. कल्याणया एकच गेम हा दुपारी 2.45 ओपन होतो तर सायंकाळी ४.४५ ला क्लोज होतो. ही संपूर्ण प्रकारात अक्षय व दिलिपचे लाखोंचे कलेक्शन होते. हे दोघे यातील अर्धी रक्कम ही पाटणबोरी येथील अशोक नामक व्यक्तीकडे वळवितात.

पोलिसांपासून वाचण्यासाठी लढवली अनोखी शक्कल
मटका चालकाने मांडवी गावात येणा-या मुख्य मार्गावर ४ ते ५ तरुण मूल पहा-यासाठी ठेवली आहे. हे मुलं पोलीस व इतर एलसीबी पथक किंवा गावात येणा-या अऩोळखी व्यक्तीवर लक्ष ठेवतात. दोन्ही मटका चालकाचे सर्व व्यवहार हे एसबीआयच्या खात्यातून चालतात. पोलिसांनी या खात्याची चौकशी केल्यास मोठे घबा़ड बाहेर पडू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.