अडेगाव येथे मंजुर असलेल्या सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करा
सरपंच यांची ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे मागणी
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे असलेले गाव अडेगाव येथे 33 केव्ही विद्युत परवठा त्वरित सूरु करावा अशी मागणी सरपंचांनी ऊर्जामंत्री यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
अडेगाव परिसरातील खातेरा, गाडेघाट, आमलोन, वेडद, तेजापूर, रामपूर गावातील शेकडो लोकांची शेती असून बहुतांश शेती एरिकेशन आहे. कृषी पंपाकरिता विजेची जोडणी करण्यात आली आहे. उन्हाळ्यात शेतीला पाणी देण्याकरिता स्प्रिंकलरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे विद्युतच ही वापर होतो.
पाणी देण्याकरिता प्रत्येक शेतकरी विद्युत चा वापर शेतीला पाणी देण्याकरिता करीत असल्याने विजेचा लोड वाढून वारंवार वीज गुल होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मोटरपंप जळून शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावे लागते व शेतीला पाणी देण्याकरिता मोठी अडचण होते.
अडेगावसह परिसरातील गावला विद्युत पुरवठा करण्यासाठी पांढरकवडा – वणी वरून विद्युत पुरवठा देण्यात आला आहे . परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात एरिगेशन , कंपन्या , त्याचप्रकारे मोठ्या प्रमाणावर घरगुती कनेकशन असल्याने विजेचा लोड अपुरा होत आहे परिसरातील अडेगाव व्यतिरिक्त आमोलन ,खातेर, तेजापूर व इतर गावातील जनतेला 33 केव्ही सबस्टेशन असल्याने वीजपुरवठा सुरळीत चालू राहत नाही तरी अडेगाव येथे 132 केव्ही सबस्टेशनचे मंजूर करून असताना सबस्टेशन चे काम अद्यापही चालू झाले नाही.
अडेगाव येथे 132 केव्ही सबस्टेशनचे काम त्वरित चालू करून परिसरातील जनतेच्या समस्या दूर कराव्या असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे 132 केव्ही सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करावे असे निवेदन देण्यात आले आहे . त्यावेळी ग्रा.प.सरपंच सीमा लालसरे, संतोष पारखी, दत्ता लालसरे, गणेश पेटकर उपस्थित होते.