मानकीत मध्यरात्री चोरट्यांचा हैदोस, 50 हजारांचा मुद्देमाल लंपास

एकाच रात्री 4 घरफोड्या, गाव दहशतीत

0

विवेक तोटेवार, वणी: बुधवारची मध्यरात्र मानकी वासियांसाठी दहशतीची ठरली. एका रात्री चोरट्यांनी तब्बल 4 घरे फोडली. त्यातील तीन चोरी तर अपयशी ठरली मात्र एका चोरीत चोरट्यांनी चांगलाच हात साफ करत तब्बल 50 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानकी येथील रहिवाशी असलेले महादेव संजय शालीक पुंड (37) यांना बुधवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी साप चावला. त्यामुळे ते उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात गेले होते. त्यांचे सोयरे वणीतील माळीपूरा येथे राहतात. रात्री त्यांनी सोय-यांकडे मुक्काम केला. सकाळी 8 वाजता त्यांच्या पत्नीने त्यांना फोन करून घरी चोरी झाल्याची माहिती दिली.

महादेव तातडीने गावी परत गेले. त्यांनी घरी जाऊन बघितले असता आलमारी फोडलेली होती. आलमारीतील सोने, चांदी व नगदी 13,500 रुपये असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी तात्काळ वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भादंविच्या कलम 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास प्रभाकर कांबळे करीत आहे.

चोरट्यांनी फोडले एकाच रात्री 4 घरी
चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री (दिनांक 5 ऑगस्ट) मानकी येथील 4 घरे फोडली. त्यातील विनोद काकडे, कोंडु चौधरी, महादेव नागपुरे यांच्या घरात चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही. विशेष म्हणजे चोरट्यांनी संपूर्ण प्लान आखून ही चोरी केली. पळून जाण्यासाठी चोरट्यांनी जागोजागी असलेले तारेचे कुंपण कापले होते. एकाच दिवशी 4 घरफोडीने मानकी गाव दहशतीत आले आहे.

हे देखील वाचा:

शेताच्या कडेला लावलेली दुचाकी लंपास

सालेभट्टी येथील बोगस कामाची चौकशी न केल्यास आमरण उपोषण

Leave A Reply

Your email address will not be published.